चामोर्शी:- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील यात्रा रद्द करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो पुन्हा जास्त डोके वाढवू नये, याची खबरदारी म्हणून वर्षानुवर्षे चालत आलेली मार्कंडादेव परिपूर्ण रद्द करण्यात आलेली आहे. या यात्रेचे विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीला या यात्रेला खूप दूरवरचे नागरिक येऊन आपली संस्कृती, परंपरा कायम ठेवण्यासाठी येत असतात. परंतु या परंपरेला कोरोनाचे ग्रहण लागलेले आहेत. त्यामुळे लोकांच्याच आरोग्याची सुरक्षितता जोपासण्यासाठी यात्रा बंद करण्याचे काम करण्यात आलेले आहे.
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडादेव येथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. आंध्रा प्रदेशातुन तसेच विदर्भाच्या कानाकोपऱ्यातील भक्तगण तसेच इतर राज्यातील सुद्धा या यात्रेस मोठ्या संख्येने येत असतात. त्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने दरवर्षी महाशिवरात्री यात्रेचे नियोजन केले जाते. परंतु मागील वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना या रोगाने पुन्हा आपला वेग वाढविण्यासाठी सुरुवात केलेली आहे. ही सुरुवात थांबविण्यासाठी दिनांक 10 मार्च ते 20 मार्च पर्यंत चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव यात्रा रद्द करण्याचे परिपत्रक जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी काढून यात्रा रद्द केलेली आहे.