Top News

स्वतःच गावातील नाल्यांची साफसफाई करून ग्रामपंचायतीचे डोळे उघडले.

साखरवाही येथील ग्रामपंचायत सदस्यांची श्रमदानातून गांधीगिरी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- साखरवाही ग्रामपंचायतीच्या पहिल्या मासिक सभेत वेळोवेळी सरपंचाकडे गावातील नाल्यांची   साफसफाईची मागणी केल्यानंतरही या गंभीर समस्यांकडे लक्ष न दिल्याने अखेर विरोधी ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच श्रमदान करीत गावातील नाल्यांची साफसफाई  करून सरपंचाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. ही गांधीगिरी पाहून सरपंच घराला कुलूप लावून आपल्या कुटुंबासह निघून गेले.

       साखरवाहीच्या 26 फेब्रुवारीला पार पडलेल्या मासिक सभेत ग्राम पंचायत सदस्य विनोद खापणे, प्रिया ढवस, कीर्ती कडुकर व भाऊराव कुळमेथे यांनी सरपंच नीरज बोंडे यांच्या घरासमोरील गावातील नाल्यांचा मुद्दा मांडला व गावातील नाल्या घानीने टुडुंब भरल्या असल्याने नागरिकांच्या आरोग्यविषयीचा प्रश्न उपस्थित करून पंधरा दिवसात नाल्या साफसफाईची मागणी केली. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायती तर्फे नाल्यांसफाईची कारवाई करण्यात आली नाही. शेवटी गावकऱ्यांचे हित लक्षात घेऊन वरील सदस्यांनी श्रमदान करीत गावातील नाल्यांची साफसफाई करून त्या स्वच्छ केल्या. ग्रामपंचयतीचा डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गावातील ग्रामस्थ आशिष वाढई, शुशोधन वानखेडे, भीमराज आल्यावर, युसूफ शेख, कवडू सोयाम, सुधाकर भोगेकर, सुरेश दरवेकर, ईश्वर निब्रड, विशाल पाऊनकर उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने