पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून विवाहितेने केली आत्महत्या.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.        March 16, 2021
चंद्रपूर:- पतीने मोबाईल चा हट्ट पुरवला नाही म्हणून 27 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घुगूस शहरातील हिमाचल लाईन शास्त्रीनगर परिसरात घडली. विवाहितेचे नाव 27 वर्षीय लक्ष्मी सुरेश कुममरी आहे.

वाघाच्या हल्यात चेक आष्टा येथील इसम ठार.
👇👇👇👇👇👇

         लक्ष्मीचे पती हे पेंटिंगचे काम करीत होते, मागील आठवड्याभरापासून लक्ष्मीने पती सुरेश जवळ मोबाईलचा हट्ट लावला मात्र सुरेशला कामाचे पैसे न मिळाल्याने त्याने पत्नी लक्ष्मीला 2 दिवस थांबायला सांगितले होते. पत्नीचा हट्ट पुरवावा म्हणून आज सुरेश ने मोबाईल घेण्याचे ठरविले होते. त्यानुसार सुरेश पैसे घेऊन घरी आला मात्र पत्नी लक्ष्मी ने तो पर्यंत गळफास घेत आत्महत्या केली. लक्ष्मी ने आपल्या 8 महिन्याच्या व 2 वर्षाच्या बाळाचाही विचार केला नाही व मोबाईलच्या हट्टापायी जीव गमावून बसली. पती सुरेशवर सध्या दुःखाचे जणू डोंगरच कोसळले.