एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 बिबट्यांचा मृत्यू.

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 2 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत सावली तालुक्यातील बोथली गावाजवळील नाल्यात 8 वर्षीय नर आढळला आहे. बिबट्याचे सर्व अवयव शाबूत आहे, पण शरीर कुजल्यामुळे मृत्यूच्या नेमक्या कारणाचा निष्कर्ष काढता आलेला नाही.

दुसऱ्या घटनेत चंद्रपूर तालुक्यातील पायली-भटाळी गावाजवळ मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली. या बिबट्याच्या शरीरावर झुंजीच्या जखमा असल्यामुळे वाघासोबत झालेल्या झुंजीत हा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)