भामडेळी येथे निर्जंतुकीकरण फवारणी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलेले असून शहरांपासून खेड्यांपर्यंत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असल्याने भद्रावती तालुक्यातील भामडेळी या गावात नुकतीच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली.

भद्रावती तालुका कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला असून तालुक्यातील खेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच कारणामुळे भद्रावती तालुक्यातील ताडोबाच्या कुशीत वसलेल्या

भामडेळी गावात नुकतीच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. शिवाय लोकांना मास्क वापरणे, स्वच्छता राखणे व अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडणे अशी जनजागृती करण्यात आली.

या वेळी सरपंच सौ सुषमा अमोल जीवतोडे, उपसरपंच शामल ननावरे, विजय भोपरे, शीतल दाभेकर आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.