अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांचा दुकानदारांना इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील ग्राहकांच्या प्राप्त तक्रारीनुसार काही प्रतिष्ठीत ईलेक्ट्रॉनिक्स दुकानदार विरूद्ध खोट बोलुन सामान विक्री करण्याची तक्रार प्राप्त होत आहे.
तक्रार ही कुलरच्या संर्दभातील असुन कुलर मधील मोटर कॉपर वाईंडींगची आहे असे सांगुन अँल्युमिनीयम वाईंडींगची मोटर असलेले कुलर कॉपर वाईंडींगच्या ज्यादा भावाने विकल्या जात आहे. शिवाय ग्राहकाने तक्रार केल्यास त्याला उडवा उडवीचे उत्तर देत आहे. त्यामुळे साधारण ग्राहकांची ही फसवणुक आहे.
ख-या किंमतीपेक्षा जास्त किंमत सामानावर लिहुन ठेवतात आणि तुमच्या साठी कमी करतो म्हणुन सरळ दोन ते तिन हजार रूपये कमी करतात. यात ग्राहकाला कमी किंमत केल्याचे समाधान करून वाजवी किंमतीपेक्षा जास्त दराने सामान विक्री केले जाते. काही दुकानदार तर विकेलेले सामान खराब झाल्यास वॉरंटी संपेपर्यंत खोटे बोलुन वेळ काढुन घेतात आणि वॉरंटी संपली की हात वर करतात.
त्यामुळे शहरातील सर्व दुकानदार बांधवांनी प्रामाणिकपणे व्यवसाय करावे अशी विनंती करण्यात येत आहे. कारण आता पुन्हा अशी तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत दुकानदारांवर कार्यवाही करण्यात येईल. असा ईशारा अखिल भारतिय ग्राहक पंचायत भद्रावती यांनी शहरातील सर्व दुकानदारांना दिला आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतकडुन सर्व ग्राहकांना आव्हाहन करण्यात येते की, जागृक बना. कोठल्याही सामानाची खरेदी करतांना पक्के बिल, गॅरंटी-वॉरंटी कार्ड घ्या. कोणत्याही दुकानदाराकडुन आपली फसवणुक झाली असे वाटल्यास, घेतलेली वस्तुमध्ये दोष असल्यास, दुकानदार वस्तु घेतल्यानंतर दोष असलेल्या वस्तु बदलुन किंवा दुरूस्त करून देत नसल्यास लेखी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांचे कड़े करावी.