Top News

"या" वर्गातील विद्यार्थी विनापरीक्षा "पास"; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.

Bhairav Diwase.      April 03, 2021
बघा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
👇👇👇👇👇👇
मुंबई - राज्यातील वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

करोनामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरु झाले होते. अनेक ठिकाणी शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. ज्या ठिकाणी सुरु झाल्या त्या ठिकाणी देखील अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही.

इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल हा सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. मूल्यमापन होऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने