Click Here...👇👇👇

एकाच दिवशी आई व मुलाचा कोरोनामुळे मृत्यू.

Bhairav Diwase
गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दुःखद घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील आई व मुलाचा कोरोना आजाराने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने तालुक्यात शोककळा पसरली आहे.

रविवारी कौशल्याबाई बालाजी भोयर ( ७० ) व दिवाकर भोयर ( ५१ ) यांचे एकाच दिवशी निधन झाले. कौशल्याबाई या गोंडपिपरी येथील विलगीकरण केंद्रात उपचार घेत होत्या. त्यांचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मुलगा दिवाकर चंद्रपूर जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होता. दुपारी १.३० वाजता दिवाकर भोयर यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.