चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री संजय देवतळे यांचे निधन. death

Bhairav Diwase
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*दुःखद बातमी*


महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजय देवतळे यांचे आज दि.२५ एप्रिल रोजी नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दु:खद निधन झाले.
      दहा-बारा दिवसापासून ते नागपूरला भरती होते. दोन-तीन दिवसात त्यांना सुट्टीही होणार होती.परंतू अचानक काल त्यांची प्रकृती खालावली आणि आज त्यांचे निधन झाले.
      संजय देवतळे यांनी ४ वेळा वरोरा-भद्रावती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. एकदा ते राज्याच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिले होते. शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता.संपूर्ण विधानसभा क्षेत्रात त्यांनी कार्यकर्त्यांची मजबुत फळी तयार केली होती. अत्यंत शांत, संयमी आणि साधे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे वरोरा-भद्रावती क्षेत्रातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.