शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला:- आशिष देवतळे जिल्हाध्यक्ष भाजयुमो चंद्रपुर (ग्रा) #death

Bhairav Diwase
Bhairav Diwase April 28, 2021
पोंभुर्णा चे माजी नगरपंचायत अध्यक्ष गजानन गोरटीवार यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी व्‍यक्‍त केली आहे.

गजानन गोरटीवार यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. नगरपंचायत सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. नगरपंचायत चे अध्यक्ष व भाजपा तालुका अध्यक्ष म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने पोंभुर्णा तालुक्याचे राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो असे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी म्‍हटले आहे.