अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगणारे, फार जवळीक असणारा नेता गजू भाऊ यांच्या रूपात गमावला:- आदित्य शिंगाडे भाजयुमो जिल्हा संयोजक सोशल मीडिया चंद्रपूर (ग्रा)

Bhairav Diwase


बल्लारपूर:- पोंभुर्णा भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार यांच्या निधनाची वार्ता ऐकून मन सुन्न झाल. पोंभुर्णा शहर असो वा तालुक्‍याचा ग्रामीण भाग भाजपाचे संघटन बळकट करण्‍यासाठी त्‍यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. जनतेच्‍या हाकेला तत्‍परतेने ओ देणारा हा नेता पोंभुर्णा तालुका भाजपाची जमेची बाजु होती. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न मांडणारा व्यक्ती म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. गजानन गोरंटीवार हे जग सोडुन जाणे ही बाब प्रचंड धक्‍कादायक आहे, या बातमीवर माझा काही काळ विश्‍वासच बसला नाही. त्‍यांच्‍या निधनाने भाजपा परिवारासह एकुणच राजकीय व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्‍यांच्‍या परिवारावर कोसळलेले दुःख मोठे आहे. या दुःखातुन सावरण्‍याचे बळ त्‍यांच्‍या कुटुंबियांना परमेश्‍वर देवो.