नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी अशीही जपतात सामाजिक बांधिलकी.
वर्धा:- जगात लुप्त होत चाललेली माणुसकी, आपल्यातील आपुलकीचा अटलेला झरा आणि कोरोना काळात सुन्न करणारी सामाजिक परिस्थिती या सर्वांना फाटा देत जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील माजी विद्यार्थी संघटनेने आपली सामाजिक बांधिलकी जपत अनेक गरजूंना मदतीचा हाथ दिला. याबद्दल मा. जिल्हाधिकारी साहेब, आमदार, खासदार साहेबांनी या संघटनेचे कौतुक करून हाच वसा समाजातील अन्य घटकामध्ये जर रुजला तर समाजाला माणुसकीची सोनेरी किनार नक्कीच लाभेल हा मनोदय व्यक्त केला.
याचेच एक उदाहरण नुकतेच घडले नवोदय मध्ये वर्ग बारावीत शिकत असलेला प्रशिक हेरोडे हा अत्यंत गरीब विद्यार्थी आपल्या परिस्थिती नुसार सुरू असलेल्या ऑनलाइन वर्गासाठी मोबाईल नसल्यामुळे सतत गैरहजर राहत होता, ही बाब 1994 बॅच च्या एकनाथ भोयर याला कळताच त्याने तुरंत प्रशिक ची अडचण आपल्या वर्गमित्रांना सांगितली व त्याच्या बॅच च्या मुलांनी वर्गणी जमा करून त्या गरजू विद्यार्थ्याला एक नवीन मोबाईल नुकताच सुपूर्द करून बांधिलकी जपली.
याअगोदर असेच अनेक उपक्रम नवोदय विद्यालय माजी विद्यार्थी संघटना (नावा) यांच्यामार्फत राबविण्यात आलेले आहेत. यात मागील वर्षी समाजातील गरजू व्यक्तींना 3 लाख 50 हजार रुपयांच्या धान्याच्या किट वाटप करणारे हेच विद्यार्थी मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या कौतुकास पात्र ठरले होते, सोबत नुकतेच एक दुर्धर आजाराने जगाचा निरोप घेणारा नवोदय चा वायगाव (नि) येथील अभियंता असलेला माजी विद्यार्थी हर्षल पाझारे याच्या कुटुंबाला 1 लाख रुपयांचा धनादेश देऊन रक्ताच्या नात्यापालिकडे जाऊन समाजमन जिंकले. हे विद्यार्थी प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात वर्ग 10 आणि वर्ग 12 च्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करतात येथून पास होणारे बहुतांश विद्यार्थी हे एक चांगल्या पदावर असतात तरीही पैसा, मोह, माया याला फाटा देऊन नवोदय चे ऋण हे विद्यार्थी एक ना अनेक उदाहरणाद्वारे मदतीस धावून जाऊन फेडत आहेत.
कोरोना चा उद्रेक सर्वीकडे होत असताना येथील डॉक्टर झालेले विद्यार्थी समाजातील गरजवंतासाठी सदैव धावून जात असतात, हे सर्व शक्य होत आहे फक्त रक्तातील माणुसकीच्या नात्यानेच.....