🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विठ्ठलवाडा येथील वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील विठ्ठल परशुटकर वय अंदाजे 65 वर्ष यांनी दिनांक 14 एप्रिल रोज बुधवारला विठ्ठलवाडा येथील वृद्धाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

विठ्ठल परसूटकर हा गावातीलच एका शेतकऱ्यांकडे काम करण्यासाठी सालगडी म्हणून त्यांच्या शेतीचे काम पाहत होता. आज दुपारच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी म्हणून शेतात गेला. संध्याकाळ झाली तरी घरी परतला नसल्याने घरच्यांनी त्यांचा शोध सुरु केला. गावात कुठेच दिसत नसल्याने त्यांचा शोध शेत परिसरात जाऊन करण्यात आला असता एका विहिरी जवळ त्यांची पादत्राने आढळुन आली. पादत्राने विठ्ठल पशूटकर यांची असावीत ह्या अंदाजावरून विहिरीत पाहणी केली असता विहिरीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने काहीच दिसत नव्हते. प्रसंगी टॉर्च लावून विहिरीत बघितले. पण काहीच दिसत नव्हतं! विहिरीत पाणी जास्त असल्याने विहिरीतिल पाणी मोटारपंपाद्वारे बाहेर काढण्यात आले. विहिरीतिल पाण्याचे प्रमाण कमी होताच टॉर्च लावून पाहणी केली असता त्यांचा मृत्यूदेह दिसुन आला.

या घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला कळविण्यात आली असता. घटनास्थळी पोलीस कर्मचारी हजर झाले गावकऱ्यांच्या मदतीने विठ्ठलचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला. उत्तरनिय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे नेण्यात आले आहे. हि आत्महत्या कि घातपात याचा शोध पोलिस घेत आहेत.
पुढील तपास गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलीस कर्मचारी काटकर साहेब व अमित गुरनुले करीत आहेत