Top News

मंत्रिमंडळाची बैठक संपली; राज्यात अखेर संपूर्ण लॉकडाऊन लागणार, लवकरच घोषणा. Maharashtra government

Bhairav Diwase. April 20, 2021
मुंबई:- राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचे संकेत मिळत आहेत. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपलीय. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सांगितलंय. राज्यातील कोरोनाचे आकडे कमी करण्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक आहेत. कडक लॉकडाऊन हवं, ही जनतेची भावना आहे. उपचार मिळत नाहीत, ऑक्सिजन नाही, परराज्यातून ऑक्सिजन आणतोय. ही चेन ब्रेक करण्यासाठी कठोर निर्बंध हवेत. ऑक्सिजन प्लाँट उभारून हवेतील ऑक्सिजन कामी आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदींसह विविध मंत्री उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाची बैठकित कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आज राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आलं होतं. यावेळी लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे. सर्व लसी देण्यासाठी परवानगी मिळावी आहे. यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. ऑक्सिजन, लस पुरवठा दिला जाणार आहे. काही तासात लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील.

राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण, तरीही लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे, याबद्दलचा निर्णय झाला असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.

गृनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. लसीकरणारचा वेग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला परदेशामध्ये उत्पादित होत असलेल्या प्रत्येक लसीला महाराष्ट्रात आणण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारला केली जाणार आहे. भारतातील लसीचं उत्पादन मर्यादित आहे. महाराष्ट्रातील किमान 10 कोटी जनतेला लस द्यायची म्हटलं तरी देशातील लसी पुरणार नाहीत.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी आपण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण, संसर्ग वाढतच असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे, 21 एप्रिलपासून रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबद्दलच्या निर्णयाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने