मोदी सरकारच्या 7व्या वर्षपूर्ती निमित्त सेवादासनगर येतील नागरिकांना मास्कचे व कृषी समिती जि. प. चंद्रपूर तर्फे कॅलेंडरचे वितरण. Calendar

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला 7 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून व जिल्हा अध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे व संध्याताई गुरणूले यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती तालुक्यातील विविध गावातील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी मास्कचे व कृषी समिती जी प चंद्रपूर तर्फे कॅलेंडरचे वाटप सौ. कमलताई दत्ताजी राठोड सदस्या जी प चंद्रपूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सौ कमलताई दत्ताजी राठोड सदस्या जी प चंद्रपूर, श्री दत्ताजी राठोड महामंत्री भजापा ता जिवती , धोंडीरामजी आडे, रामरावजी राठोड, पंडितजी राठोड, व गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.