केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पोंभुर्णा तालुक्यात व्हाकिंग स्टिक ची काळी व मास्क चे वाटप. Pombhurna

Bhairav Diwase
जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांच्या पुढाकाराने.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- देशातील सर्वात सशक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशातील सरकारला ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतावर कोरोना चे भयानक संकट आलेले असतांना आज केंद्र सरकार ताकतीने लढत आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ते आपले योगदान समाज सेवेसाठी देत आहे.
केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांनी वृद्धांना चालण्याकरिता व्हाकिंग स्टिक ची काळी देऊन एक आधार दिला.

   कोरोना वाढत आहे. लोकांनी बाहेर निघतांना मास्क चा वापर करावा या उद्देशाने त्यांनी मास्क चे वाटप केले. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करण्याकरिता जनजागृती करण्यात येत आहे. लसीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे असे आवाहान माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जास्त महत्त्वाच्या कामाकरिताच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये सर्वांनी जागरूक असणे गरजेचे आहे असा संदेश जि. प. सदस्य राहुल संतोषवार यांनी केंद्र सरकार ला ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिले. यावेळी भाजपा कार्यकर्ते अनुप श्रिकोंडावार, राहुल वासेकर आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.