Top News

कोरोना काळात बळी पडलेल्या ऑटोरिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य व पेन्शन लागू करावे:- राजेंद्र खांडेकर


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने राज्यात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहेत. त्या आजाराने मानवी जीवनाचे चित्र बदलुन गेले आहेत. राज्यासह प्रत्येक जिल्यामध्ये कोरोना या आजारामुळे नाहक ऑटोरिक्षा चालकांचा बळी गेला आहेत. कुटुंबाचा एकमेव काम करणा प्रमुख स्तंभ मुत पावल्यामुळे त्याचा परिवार उघड्यावर आलेला आहेत.
काही कुटुंबात आई-वडील, पत्नी व मुले अस आपत्य परीवार आहे. एका ऑटो चालकाच्या भरोश्यावर त्या परीवाराचा उदरनिर्वाह चालु होता. त्या परिवाराचा आधार असलेलाचा प्रमुख कोरोनामुळे मृत्यू पावल्यामुळे त्यांचा परीवाराची दशा पाहण्यायोग्य नाही. जीवन कसे जगायचे याचा पेच निर्माण झालेला आहेत.
मातृवाची छाया हरविलेल्या बालकानी समोरील भविष्यात काय करावे. त्याचे शिक्षण व इतर गोष्टी कश्या साध्य होईल, हा सर्व प्रश्नाचा गांर्भीयाने विचार केला तर नागरिकांचा व ऑटोरिक्षा चालकांचा पाठीराखा म्हणुन ओळखणारे आपले शासन त्याच मतावर कुटुंबातील कमाई करून संसार चालविणारा ऑटोरिक्षा चालक कोरोना संक्रमनाला बळी पडल्यास महाराष्ट्र शासनाची त्या ऑटोरिक्षा चालकाच्या कुटुंबास ३ हजार रू पेन्शन देण्यात यावी.
तसेच कोरोना संक्रमणात आई-वडील यांचा मृत झाल्यास त्यांच्या अपत्याचे (मुला-मुलीचे) शिक्षणाचा संपुर्ण खर्च त्यांचे वयाच्या २५ वर्षापर्यंत शासनाने करावे व त्यांना जगण्याकरीता आर्थिक सहाय्यची मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचा कडे करण्यात आली आहे, असे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हा अध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष जहीर शेख, जाकीर शेख, सचिव सुनिल धंदरे, विनोद चन्ने, विलास बावणे, कुंदन रायपुरे, रमेश वझे, बंडु भगत, रंवि आंबटकर, तुषार साखरकर, राजु मोहुर्ले, किशोर वाटेकर, सतिश बोरगाटे, शंकर थोरात, मंगेश चवरे यांनी एका पत्रकाव्दारे कळविले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने