(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल पोंभुर्णा येथे ऑनलाईन समर (Summer) कॅम्प ऍक्टिव्हिटीज आयोजित करण्यात आली.
या समर कॅम्प ऍक्टिव्हिटीज मध्ये निहारिका शारदापवार, समीक्षा कात्रजवार, आरोही शर्मा, आनंदी शर्मा, तनुजा कोहरे, रचना गेडाम, जानवी सातपुते या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळवण्याकरिता समर कॅम्प ऍक्टिव्हिटी सुरू केली, असे शाळेचे संचालक प्राध्यापक संदीप ढोबळे यांनी माहिती दिली.
स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल च्या प्राचार्य संगीता देवगडे व रिजवाना शेख यांच्या मार्गदर्शनात समर कॅम्प ऍक्टिव्हिटी सुरू आहे.