Top News

कृषी सहाय्यकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग.

कृषी सहाय्यक मानेराव फरार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- येथील कृषी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याशी कार्यालयातीलच कृषी सहाय्यकाकडून असभ्य वर्तणूक केल्याची घटना उजेडात आली असून, याप्रकरणी संबंधित कृषी सहाय्यकाविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.घटनेच्या दिवशी स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषीसेवक महिलेस तालुका कृषी अधिकारी यांनी कामानिमित्य बोलाविल्याने त्या कार्यालयात गेल्या.
दरम्यान कृषी अधिकारी कामात व्यस्त असल्याने सदर महिला कर्मचारी साहेबांच्या बोलावण्याच्या प्रतीक्षेत कार्यालयात बसल्या होत्या. तेव्हा दुसऱ्या खोलीमधून बाहेर निघालेल्या त्याच कार्यालयातील कृषी सहाय्यक मानेराव यांनी कृषीसेवक महिलेशी असभ्य व अशोभनिय वर्तन केले.
पीडित महिला कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कृषी सहाय्यक मानेराव यांच्याविरूध्द भादंवी ३५४ (ए) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कृषी सहाय्यक मानेराव फरार असून पुढील तपास ठाणेदार सतिशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राजश्री रामटेके करीत आहेत.
पीडित महिला कृषीसेवकास यापूर्वीही कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या ना त्या कारणाने त्रास देण्याचा प्रकार चालविल्याने त्याचा महिलेच्या आरोग्यावर विपरित परीणाम झाला होता, हे विशेष.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने