Top News

वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी वार्डामध्ये सॅनिटायजर फवारणी.

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडेय यांचा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपूर:- सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी कुटुंबाची आणि स्वतःची खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. या अनुषंगाने तालुक्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी बल्लारपूर येथील गौराक्षण वार्ड एफडीसीएम कॉलनीच्या मागे नगर परिषदच्या साहाय्याने भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडेय यांनी नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वार्डातील प्रत्येक घरी या महामारीपासून बचावकरिता सॅनिटायजर फवारणी करण्यात आली.


कोरोना विषाणूची प्रसारित होणारी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश पांडेय यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने