Top News

"क्या हुआ तेरा वादा..... जयवंतरावजी"; "तो" व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या.


Bhairav Diwase. May 30, 2021

चंद्रपुर:- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दारुबंदीनंतर उठविल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. दारूबंदी उठवण्याला अनेक सामाजिक संघटनांचा विरोध देखील होता. मात्र, दारुबंदीनंतर अवैध दारू विक्री आणि त्याअनुषंगाने गुन्हेगारी घटना वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान दारुबंदी उठविल्यानंतर आता राजकीय जुगलबंदी पहायला मिळत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा जुना व्हिडीओ ट्विट करत जाब विचारला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, "क्या हुआ तेरा वादा..जयंतराव जी सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार, इस आश्वासन का.

यवतमाळ राहिलं दूर पण चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल"

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://twitter.com/ChitraKWagh/status/1398530609585090562?s=08

जयंत पाटील व्हिडीओमध्ये यवतमाळ मध्ये दारूबंदी करू, असे आश्वासन देत आहेत. आमचं सरकार आल्यावर पहील्या कॅबिनेटमध्ये यवतमाळ दारूबंदी करण्याचे पहीलं काम आम्ही करू, चंद्रपुरात दारूबंदी होते. तर यवतमाळ मध्ये को होत नाही, असा प्रश्न देखील जयंत पाटील यांनी व्हिडीओमध्ये उपस्थित केला आहे.


चंद्रपुरात होती २०१५ पासून दारूबंदी!

गेल्या ६ वर्षांपासून म्हणजेच २०१५ सालापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू आहे. मात्र, ही दारूबंदी उठवण्यात यावी, अशी मागणी करणारी तब्बल अडीच लाख निवेदने सरकार दरबारी पाठवण्यात आली आहे. तर दारूबंदी कायम ठेवावी, यासाठी ३० हजार निवेदनं आल्याचं सरकारी आकडेवारी सांगते. यामध्ये दारूबंदी का उठवली जावी, या कारणांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने