Top News

पालकमंत्र्यांच्या गृहक्षेत्रात पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:-तालुक्यातील पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत येत असलेली नवरगाव ग्रामपंचायत येथील ही घटना आहे.देशात कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे.अशाही परिस्थितीमध्ये आपल्या जीवाचे रान करून बातमी संकलित करत असतांना आपल्या कुटुंबाची व जीवाची पर्वा न करता पत्रकार बंधू काम करीत आहेत.लोकशाही बळकटीकरणासाठी अहोरात्र झुंज देत आहेत.त्याचप्रमाणे अश्या झुंज देत असतांना अन्याया विरुद्ध न्यायासाठी लढताना बऱ्याच जीवे मारण्याचा धमक्या ऐकत आपला लढा पत्रकार हा कायम ठेवत असतो. मग या परिस्थितीत पालकमंत्राच्या क्षेत्रात पत्रकारांना पालकमंत्राच्या निकटवर्तीय विनोद लोणकर याने पत्रकार अमोल निनावे यांना जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजेच लोकशाहीची गळचेपी होत आहे.

सविस्तर वृत्त असे आहे की अमोल निनावे यांनी व अनेक वृत्त प्रसार माध्यमांनी नवरगाव ग्रामपंचायतची बातमी आठवड्यापूर्वी नवरगाव ग्रामपंचायतचा अजबच कारभार,बोटावर मोजण्या इतक्या घरी केले सॅनिटायझर फवारणी या मथड्याखाली बातमी प्रकाशित केली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने विनोद लोणकर यांनी अमोल निनावे यांना फोनवरून संपर्क करून अश्लील शिवीगाळ ,तू बाहेर भेट कधी मी तुला घरी येऊन मारतो.ह्या प्रकारच्या अश्लील शब्दात पत्रकाराची सामाजिक मानहानी केली आहे. त्यामुळे यावर योग्य भारतीय पत्रकार संरक्षण कायदा संहिता भा द वि कलमांचा वापर करून त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. जेणेकरून पुढे जाऊन अश्या दलालांची असं बोलण्याची हिम्मत होणार नाही.
त्यातल्या त्यात सन्मानीय चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या क्षेत्रात हा अनुचित प्रकार व पत्रकारांशी गैरवर्तणुक करणे हे कितपट योग्य आहे.त्याचप्रमाणे सिंदेवाही पोलीस ठाण्यात ह्या बाबतीत अश्या परिस्थितीत तक्रार केली.या तक्रारीत भारतीय पत्रकार संरक्षण कायदा बाजूला ठेवून व अश्लील शिवीगाळ जीवे मारण्याची धमकी आणि सामाजिक मानहानी ह्या कलमा दूर ठेवून पोलीस अधिकाऱ्यांनी भा द वी कलम 504 ,506 चा वापर करून मन समजवणूक करणे म्हणजेच कुणाच्या दबावाखाली येऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. हे समजेनासे झाले आहे.



सिंदेवाही तालुक्यात पत्रकारावर होणारे हल्ले हे निंदनीय बाब आहे असे हल्ले करण्याऱ्याच्या बाजूने कलम 504,506 चा वापर करून त्यांची पाठराखण केलेली आहे. ह्या निंदनीय प्रकार पुरोगामी पत्रकार संघ शाखा सिंदेवाही च्या वतीने कदापिही खपवून घेणार नाही.
भगवंत पोपटे अध्यक्ष
पुरोगामी पत्रकार संघ, सिंदेवाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने