Top News

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुढाकाराने.

पोंभूर्णा कोविड केअर सेंटरला 2 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्‍हयातील कोरोना रूग्‍णांची वाढती संख्‍या चिंताजनक आहे. मृत्‍युचा दर देखील मोठया प्रमाणावर आहे. कोरोना रूग्‍णांना योग्‍य उपचार मिळावा यासाठी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वतीने पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला 2 ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.
तसेच कोविड केअर सेंटरमध्ये काम करत असलेले डॉक्टर व परिचारिका यांचा सन्मान करून हेल्थ किट देण्यात आले.
भाजपाचे नेते तथा पोंभुर्णा न. प. चे पूर्व नगराध्यक्ष स्व. गजानन गोरंटीवार यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यांचे पुत्र दर्शन गोरंटीवार यांचे हस्ते पोंभुर्णा कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले. अनेकदा उमेदवार राहिल्याने मी स्व. गजाभाऊ गोरंटीवार यांचा मी कायम ऋणी राहील अशा भावना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत आरोग्य विभाग गंभीर असून नागरिकांनी सुध्दा आपली सुरक्षा बाळगावी व खबरदारी घ्‍यावी, असे आवाहन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले. सोबतच पोंभुर्णा येथील कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व परिचारिका यांचे कौतुक केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य खुशाल बोंडे जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी, दर्शन गोरंटीवार, माजी नगराध्यक्षा श्वेता वनकर, माजी उपनगराध्यक्षा रजिया कुरेशी, सुनिता मॅक्लवार, वैशाली बोलमवार, अजित मंगळगिरीवार, मोहन चलाख, ईश्वर नैताम, गजानन मडुपवार अजय लोणारे अजय मस्के, विनोद कानमपल्लीवार, रूषी कोटरंगे, दिलीप मॅक्लवार, चरण गुरनुले आदीची उपस्थिती होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने