Top News

वाळू तस्करी करणाऱ्या दहा ट्रॅक्टरवर स्थानीक गुन्हे शाखेची कार्यवाही.

अंधारी नदीपात्रात करीत होते वाळू उत्खनन.

५० लक्ष ५० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त; १० लोकांवर गुन्हा दाखल.

पोंभूर्णा तालुक्यातील रेती संबंधित मोठी कार्यवाही.

पोंभुर्णा तालुक्यातील रेती माफीयांचे धाबे दणाणले.
Bhairav Diwase.      May 23, 2021

पोंभूर्णा:- पोंभूर्णा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अंधारी नदीपात्राच्या भिमणी घाटावर अवैधरित्या वाळू तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिमणी घाटावर धाड टाकून रेती भरलेले १० ट्रॅक्टर जप्त केले असून पन्नास लक्ष पन्नास हजार रूपयाचे मुद्देमाल जप्त केले. सदर रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर पोंभूर्णा पोलिस ठाण्यात लावण्यात आले असून १० आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.


आज दिनांक २३ मे रोजी पहाटे ३ वाजताच्या दरम्यान चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोंभूर्णा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना अंधारी नदीपात्राच्या भिमणी घाटावरून अवैधरित्या रेती भरून वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिमणी घाटावर पोहचले असता तिथे १० ट्रॅक्टर अवैधरित्या वाळू तस्करी करताना निदर्शनास आले.
रेती तस्करी करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेवून गुन्हा दाखल करण्यात आले.सदर रेती तस्करी करणारे दहा ट्रॅक्टर पोंभूर्णा पोलिस ठाण्यात लावण्यात आले असून १० आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पुढील तपास ठाणेदार धर्मैंद्र जोशी यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार तुळशिराम कुळमेथे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने