पोंभुर्णा पोलीस, तहसील तथा नगरपंचायत प्रशासन ॲक्शन मोडवर.

Bhairav Diwase
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर दंडात्मक कार्यवाही तथा आर.टि.पि.सी.आर (RTPCR) चाचणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संपूर्ण देशभर कोरोनाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. नागरीकांनी विनाकारन घराबाहेर पडु नये अशा सुचना प्रशासना कडून वारंवार दिल्या जात आहेत.
मात्र याला कुठेतरी गालबोट लागल्याचे दिसत आहे. कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव थांबविण्यासाठी पोंभूर्णा प्रशासन शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जोशी, तहसीलदार खटके यांच्या प्रमुख नेतृत्वात नगरपंचायत प्रशासनाने आज सकाळी ॲक्शन मोड वर येत विनाकारन फिरनाऱ्या चांगलाच धळा शिकवीला दंडात्मक कार्यवाही करून आर.टि.पि.सी.आर (RTPCR) चाचणी करण्यात आली. रीपोर्ट तात्काळ देऊन पॉझीटिव्ह रूग्णांनानांना गृहविलगीकरण करण्यात आले. या कार्यवाहीमुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यावर आळा बसेल, हे मात्र निश्चित....