Top News

विद्यार्थ्यांच्या शुल्क कपात च्या निर्णयाचे भाजयुमो तर्फे अमरावती विद्यापीठासमोर फटाक्यांनी जल्लोष..!!! #BJYM

कुलसचिव अजय देशमुख यांचे मानले पेढा भरवून आभार.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपात करणार असल्याची माहिती उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी केली जाहीर...


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
अमरावती:- राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लाऊन धरली होती.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला भारतीय जनता युवा मोर्चा द्वारे भाजयुमो प्रदेश सचिव यांच्या नेतृत्वात टाळा ठोकण्यात आला होता. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी राज्यपाल महोदयांचीही भेट घेऊन मागणी केली होती.

त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी अशी शुल्क कपात करावी अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी ट्विट द्वारे दिली आहे.
ठीक आहे, "देर आये-दुरुस्त आये"... भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल आपले आभार आणि अभिनंदन.

पुढील दोन मागण्यांवर ही सकारात्मक निर्णय करावा -
१. सन २०२०-२१ साठीही हा निर्णय लागू करावा
२.शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा.

यावेळी भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर, ऋषिकेश देशमुख, भाजयुमो महामंत्री अंकित चुंबळे, प.स.विरेंद्र लंगडे, अल्पेश जुनघरे, सिद्धेश देशमुख, सिद्धेश देशमुख उपस्थित होते.

#amaravati #fees #sopankanerkar #chandrapur #bjymMaharashtra

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने