पत्नीवर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून. #murder

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील चिमूर-कोलारा मार्गावरील मासळ येथे पतीने पत्नीवर संशय घेत काठीने जबर मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना काल मंगळवारी (दि. २९) ला रात्री बाराच्या सुमारास घडली. विशाखा दीक्षित पाटील (वय २९) असे मृत पत्नीचे नाव आहे तर दीक्षित हरीदास पाटील असे संशयीत आरोपी पतीचे नाव आहे. पतीने दारूच्या नशेतच हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रिया पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संशयीत आरोपी पती दीक्षित हरीदास पाटील याला अटक केली आहे. पुढील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मंगेश मोहोड, पीएसआय गायकवाड, पोलिस निमगडे, गजभिये, गुट्टे, मडावी, खामनकर करीत आहेत.

#Murder #death #chimur #chandrapur #police