Top News

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून शेतकरी वंचित.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची तहसिल कार्यलयावर धडक.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- कोरपना तालुक्यातील जेवरा येथील अनेक शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना तहसिल कार्यलयावर धडक देऊन नायब तहसिलदार प्रवीण चिडे यांना जेवरा गावातील नागरिकांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले.

      तालुक्यातील जेवरा गावातील नागरिकांना यापूर्वी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते सुरळीतपणे मिळत होते,परंतु  माहे एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ चा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यामुळे अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित होते त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी सदर प्रकरण भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत तहसिल कार्यालय येथे सर्व शेतकऱ्यांना घेऊन नायब तहसिलदार यांना निवेदन दिले.व आपण या प्रकरणाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळविण्यासाठी उचित कार्यवाही करू असे नायब तहसिलदार प्रवीण चिडे यांनी सांगितले.
           यावेळी बंडू गोंडे, घनश्याम ताजने,उरकुडा आत्राम,भारत मेश्राम,योगीराज मेश्राम,बाबराव मेश्राम,रमेश कोटनाके,विठ्ठल मेश्राम उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने