Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली येथे ऑक्‍सीजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध.


आशावर्कर यांना ऑक्सिमीटर व चिंचोली, विरुर व सुब्बई गावातील नागरिकांना मास्कचे वाटप.

कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांचे हस्ते वाटप.     
     
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना महामारीच्या मागील महिण्यात जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासुन अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले याची गंभीर दखल घेत माजी पालकमंञी आ.सुधिरभाऊनी चिंचोली Phc ला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले. तसेच कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमितपणे मास्कचा वापर करणे, दोन व्यक्तीमध्ये संपर्काच्या वेळी  सुरक्षित अंतर राखणे, नियमित हात स्वच्छ ठेवणे यासोबतच कोरोना लसिकरणाबाबत ग्रामीण भागात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सारासार मार्गदर्शन करून कोरोनाचा धोका टाळणयासाठी लसीकरणाचे महत्व सुनिलभाऊ ऊरकुडे यांनी उपस्थित नागरिकांना पटवून दिले. 

    यावेळी उपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते सतीशजी कोमरपल्लिवार, भाजपचे विरुर शहर अध्यक्ष भीमराव पाला, चिंचोली गावचे सरपंच पिल्लाजी पा. भोंगळे, उपसरपंच सौ.पुष्पांजली धनवलकर, हितेश गाडगे ,शामराव कस्तुरे ,नल्ला लक्ष्मण, बाबुराव कुरवतकर, डॉ. नगराळे तसेच भाजपा पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने