१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. Vaccine

Bhairav Diwase
शिवाज्ञा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य शाखा नांदगाव यांची मागणी.

नांदगाव:- दिनांक ४ जून रोजी नांदगाव पेठ येथे जि. प. अँलोपॅथिक दवाखाना नांदगाव पेठ येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.अली सर यांना १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी यासाठी शिवाज्ञा प्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य (शाखा नांदगाव पेठ) यांचा वतीने निवेदन देण्यात आले.

१८ ते ४४ हा वयोगट अत्यंत तडफदार युवा वर्गाचा असून युवावर्ग देशाच भविष्य असते म्हणून या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम आयोजित करावी अशी विनंती शिवाज्ञा प्रतिष्ठाण तर्फे आरोग्य विभागाला करण्यात आली. लसीकरण मोहीम दरम्यान सहकार्य पाहिजे असल्यास शिवाज्ञा प्रतिष्ठाण चे कार्यकर्ते हजर राहून आरोग्य विभागाला सहकार्य करतील अशी हमी सुद्धा देण्यात आली. शिवाज्ञा प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष पवन नंदकिशोर ताथोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

   त्याप्रसंगी प्रा. मोरेश्वर इंगळे, किशोर नागापूरे, पत्रकार निलेश सरोदे, अमित डोईफोडे, धीरज खोकले, ऋत्विक इंगोले, बंटी आमले, अविनाश तायडे, राहुल सुंदरकर, तुषार राऊत, अभिषेक आमले, रितिक आमले, ऋषिकेश डंबाळे, श्रीकांत राऊत, गौरव जवके, जयेश साबळे, रोशन तुळे, वेदांत भटकर, सौरभ आमले, अमोल झगडे. इत्यादी सर्व उपस्तिथ होते.