कचऱ्यात सापडलेल्या नवजात बालिकेचा मृत्यू.

Bhairav Diwase

24 जुनला नवजात अर्भक सापडली होती कचऱ्यामध्ये.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
ब्रम्हपुरी:- नवजात अर्भक कचऱ्यात फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ब्रम्हपूरी तालुक्यातील मेंडकी येथे दि. 24 जुन (गुरुवार) सकाळच्या सुमारास उघडकीस आला.
नवजात अर्भक सापडले कचऱ्यामध्ये. https://www.adharnewsnetwork.com/2021/06/newborns-found-in-trash.html

या विषयी अधिक माहिती अशी की, दि. 24 जुन (गुरुवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गावातील काही महिला शौचालयाकरीता बाहेर जात होत्या. यावेळी त्‍यांना गावातील बसस्टॉप पासून माळी मोहल्यामध्ये जाणाऱ्या रस्त्यावर मोकळ्या जागेत कच-यात एका कापडामध्ये गुंडाळलेले अर्भक आढळून आले. नंतर तिला ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे हलविण्यात आले. परंतू तिला लगेच जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले. परंतू तिथेही उपचार न झाल्याने तिला तिथूनही जिल्हा रूग्णालय चंद्रपुर येथे हलविण्यात आले. उपचाराअंती जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे अखेरचा श्वास घेतला. तिचा 11.45 वाजता मृत्यु झाला.

मिळालेल्या माहितीनुसार कचऱ्यात बालिका फेकणाऱ्या गुन्हेगारास मेडंकी पोलिसांनी अटक केली आहे. हि बालिका अनैतिक संबंधातून जन्मास आली होती. अपराध क्र.412/2021भा.द.वि. 315 अन्वये गुन्हा दाखल केला असून, पूढिल तपास मेडंकि पोलिस करित आहेत.