जनता विद्यालय साखरवाही येथे पर्यावरण दिन साजरा.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जीवनात वृक्षांचे महत्त्व अन्यसाधारण आहे. तेव्हा मानवाला जिवंत राहायचे असेल तर वृक्षारोपन करून वृक्षसंवर्धन केलेच पाहिजे.
आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बंडूजी लांडे सर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याप्रसंगी बोलतांना लांडे सर म्हणाले की कोविड 19 कार्यकाळात अनेक लोकांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक लोकांना आपला आपला प्राण गमवावा लागला हि खूप चिंतेची बाब असून आपण जर वुक्षाचे संवर्धन केलं. तर देशामध्ये ऑक्सिजनची कमी जाणार नाही. तेव्हा प्रत्येकाने माझी जबाबदारी म्हणून वृक्षारोपण करून त्या वृक्षाची जतन करावं.
कार्यक्रमाला विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री. वामन खंगार, श्री परशुराम येडे, श्री अजय आगलावे, श्री ओमप्रकाश पिंपरे, श्री विवेक बोढे, श्री रविंद्रजी जेनेकर, श्री बंडू बरडे तसेच प्रयोगशाळ परीचर श्री. घनश्याम काकडे, श्री.पंकज कोंकमवार, श्रीमती निर्मलाताई बोबडे यंचे सहकार्य लाभले.