💻

💻

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठविण्याचा विरोधात सामाजिक युवा ब्रिगेड संस्थांचे तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन.


मुंडन तसेच उपोषण करण्याचे दिले निर्देशन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविल्याची घोषणा मागील आठवड्यात केली होती. त्यामुळे आज पर्यंत बंद असलेली चंद्रपूर जिल्ह्याची दारू अचानक सुरु होत आहे असे लक्ष्यात येताच सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेने जाहीर निषेध वेक्त केले. व सिंदेवाही तालुक्यातील तहसीलदार यांच्याकडे दारूबंदी हि कायम ठेवण्याची निवेदन दिले. दारू बंदी हि उठवण्यात आली तर मुंडन आंदोलन सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेच्या वतीने करण्याचे ठरविले आहे असे स्पस्ट निवेदनातून म्हटल्या गेले आहे.
दारूबंदी हि यशवी रित्या पार पाडण्यात नवीन राज्य सरकार हि पर्यंत न करता सरळ सत्ता बसताच अगोदर दारू बंदी हटविण्याचा निर्णय घेणे म्हणजे लोकांचे संसार उध्वस्त करण्याचे धोरण ठरविल्या सारखे हे निर्णय झाले आहे असे मनोगत सामाजिक युवा ब्रिगेड संस्थांचे अध्यक्ष्य श्री अमोल सेवादास निनावे यांनी म्हटले आहे.      
       सामाजिक युवा ब्रिगेड संस्थे हि सतत दोन वर्षांपासून दारू विक्रेत्या विरोधात कठीबन्द आहे. त्यामुळे आज गावातील अनेक लोकांचे मुले बाळे, व पूर्ण कुटुंब सुखी समाधानी असताना हि दारूबंदी का बर उठविण्याचा निर्णय पालकमंत्री यांनी घेतला असेल या मागचा उद्देश हा चुकीचा आहे. त्यामुळे आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी हि बंद च ठेवून नवीन कठोर कारवाही करणारे अधिकारी तसेच अधिक कडक नियम लावून दारूबंदी कशी यशश्वी  रित्या पार पाडता येणार यासाठी आघाडी सरकारने ठरवून हि उठवलेली दारूबंदी पूर्णपणे बंद ठेवावी असे सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे मत आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयाच्या सामोरे आमरण उपोषण तसेच मुंडन आंदोलन करण्याचे निर्देश निवेदनातून देण्यात आले आहे.निवेदन देताना  सामाजिक युवा ब्रिगेड संस्थेचे अध्यक्ष्य अमोल निनावे, सदश्य प्रणय गायकवाड, गजानन गुरुनुले, सौ. अर्चना कुंभरे तसेच संघठनेचे सदश्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत