Top News

महिला आघाडी सशक्त आणि निर्भिड पणे समाजासाठी काम करणारी तयार करा- आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार #BJP

महिलांनी राजकारणात फक्त संख्या न वाढवता सहभाग वाढवावा- मा. हंसराजभैय्या अहिर

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज दिनांक. २८ जुलै २०२१ रोजी, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृह,चंद्रपूर येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडी,जिल्हा,चंद्रपूर ग्रामीण ची संघटनात्मक जिल्हा बैठक घेण्यात आली. यावेळी माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार लेखा समिती अध्यक्ष यांनी महिला आघाडी जिल्ह्यात कशी मजबूत करता येईल यावर मार्गदर्शन केले. माननिय. हंसराजजी अहिर माजी केंद्रीय राज्य मंत्री यांनी महिलांचे भाजपासाठी मोठे योगदान राहिलेलेच आहे, त्यापेक्षाही जास्त योगदान महिलांनी भाजपाचे संघटन व बूथ रचनेच्या कार्यात द्यावे असे आवाहन करण्यात आले. आ.मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार मा. हंसराज भैया अहिर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विविध आघाडीचे अध्यक्ष नियुक्ती करण्यात आले. तसेच देश गौरव सिल्वर मेडल विजेती, मीराबाई चानू यांच्या अभिनंदन ठराव देण्यात आला. तसेच ओबीसी भाजपा महिला आघाडी, पदी प्रा सौ.रत्नमाला भोयर भाजपा महामंत्री पदी सौ. शोभाताई पिदुरकर आणि इतर महिला आघाडी प्रमुख यांची नेमणूक करण्यात आली.यावेळी
माननीय देवराव भोंगळे अध्यक्ष भाजपा चंद्रपूर,कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला आघाडी जिल्हा मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले.


यावेळी उपस्तीत संध्याताई गुरनुले अध्यक्ष जिल्हा परिषद,चंद्रपूर, वनिताताई कानाडे उपाध्यक्ष प्रदेश,रेणुका ताई दुदे अध्यक्ष प्रदेश,अल्का आत्राम पंचायत समिती पोंभुर्णा सभापती तथा अध्यक्ष महिला आघाडी,चंद्रपूर रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मुल, रोशनी खान महिला बालकल्याण सभापती, कल्पना बोरकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, अर्चनाताई जीवतोडे माजी सभापती कृषी, गोदावरी केंद्रे माजी सभापती बालकल्याण, विजयालक्ष्मी डोळे महामंत्री, सायरा शेख महामंत्री, नामदेव डाहुले महामंत्री आदी सर्व भाजपा, जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी उपाध्यक्ष सचिव, अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष पंचायत समिती सभापती, तालुका अध्यक्ष उपस्थित होते.
#BJP

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने