मोदी सरकार प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देणार. #Centralgovernment #Onefamilyonejob

Bhairav Diwase
0

सोशल मीडियावर रंगली चर्चा, जाणून घ्या "सत्य"
नवी दिल्ली:- कोरोनाने गेल्या दीड वर्षांपासून देशात धुमाकूळ घातला आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे संसार उद्धवस्त झाले, अनेकजण देशोधडीला लागले. अनेक उद्योगधंदे बुडाल्यामुळे आणि बहुतांश उद्योगांवर मंदीचं संकट असल्यामुळे अर्थव्यवस्थेचं चक्र रुतून बसलं आहे. या काळात नोकरीचं खोटं अमिष दाखवून लुबाडले जाण्याच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. अशा परिस्थितीत जर केंद्र सरकार प्रत्येक परिवारातील एका सदस्याला नोकरी देण्याचं आश्वासन देत असेल, तर ते कुणाला आवडणार नाही? #Centralgovernment #Onefamilyonejob
अशाच एका यूट्यूब चॅनलने ही बातमी चालवली आणि बघता बघता ती व्हायरल झाली. मोदी सरकार खरोखरच प्रत्येक कुटुंबातील किमान एका सदस्याला नोकरी देणार, या बातमीचे सामान्यांमध्ये आशेचे किरण पसरू लागले. मात्र प्रत्यक्षात अशी कुठलाही योजना केंद्र सरकारच्या वतीनं सुरू करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. #pibfactcheck
असं उघड झालं सत्य.......

सध्याच्या समाजाची मानसिकता लक्षात घेऊन नोकरीबाबतचं कुठलीही बातमी व्हायरल होईल, असा अंदाज बांधत एका खासगी यूट्यूब वाहिनीवरून 'एक परिवार, एक नोकरी' या नोकरीची माहिती प्रसारित करण्यात आली. त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाल्यानंतर 'पीआयबी फॅक्ट चेक'नं यामागची वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोदी सरकारनं अशी कुठलाही योजना आखली नसल्याचं समोर आलं. कुठल्याही मुख्य माध्यमात याबाबत काहीही माहिती नसून या योजनेला दुजोरा देणारा कुठलाही पुरावा उपलब्ध होत नसल्याचं पीआयबी फॅक्ट चेकच्या वतीनं जाहीर करण्यात आलं.
अशी सरकारी योजना असती, तर देशातील सर्व प्रमुख माध्यमांनी याबाबत चर्चा केली असती. याची किमान बातमी तरी झाली असती आणि सरकारनंही या योजनेची जाहीरात केली असती. मात्र प्रत्यक्षात अशी योजना नसून बेरोजगारीनं त्रासलेल्या जनतेची थट्टा करण्याचा हा प्रयत्न असल्याचं समोर आलं आहे.
साभार:- news 18 Lokmat

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)