Top News

येनापूर परिसरात विजेचा लपंडाव. #Electricity


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडीत होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठ्या अभावी पाणीपुरवठाही ठप्प झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  #Electricity
तसेच वादळी वार्‍याने नेहमी रात्रभर बत्ती गूल राहत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु तांत्रिक बिघाडाने येनापूर ते जयरामपूर गावाची नेहमीच दहा-दहा मिनिटांनी बत्ती गूल होते. पावसाळा लागल्याने थोडा जरी वादळी वारा सुटला किंवा पाऊस आल्यास वीज पुरवठा खंडित होतो. रात्री बिघाड झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते. या परिसरात नेहमीच एक दिवसाआड संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागत आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
येनापूर येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, रात्रीच्या वेळेस वीज पुरवठ्यात बिघाड होऊन खंडित झाल्यास संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागते व दुसर्‍या दिवशी विद्युत कर्मचारी कर्तव्यावर आल्यावर तो बिघाड दुरुस्त झाल्यावर वीज पुरवठा सुरळीत होतो, तोपर्यंयंत विजेशिवाय काम भागवावे लागते. मोठा बिघाड झाल्यास ६ ते ७ तास दुरुस्त करण्यात येत नाही. संपूर्ण येनापूर व जयरामपूरपरिसरात  गेल्या आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पाऊस सुरू होताच लाइन गूल होते. रात्रभर ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. विद्युत वितरणचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत रात्रभर लाइन बंद पडत असून, ग्रामस्थांना डासांचा सामना करावा लागत आहे. पावसाचे थेंब पडले की लाइन बंद, असा प्रकार गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू आहे. सदर लाइन केव्हा सुरळीत होणार, याची संबंधित अभियंता यांनी लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अन्यता आपल्या कार्यालयावर मोर्चा काढू अशी मागणी या परिसरातील जनतेची होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने