Top News

राजुरा-गडचांदूर, राजुरा-कढोली, राजुरा-मात्रा, राजुरा-सुमठाणा, सुमठाणा-बोडगाव मार्ग बंद. #Close


खामोना, मात्रा, कढोली, सुमठाणा जवळील पुलावरून पाणी.

सुमठाणा-बोडगाव मार्ग बंद.
👇👇👇👇👇👇👇

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- मान्सूनने चांगलाच जोर पकडला आहे. मुसळधार पावसाने सलग दोन दिवस हाहाकार उडविला आहे. बुधवार दुपारपासून सर्वदूर पडत असलेल्या पावसाने रात्री पासून जोर धरल्याने नद्या, नाले, पाण्याने तुडुंब भरून वाहत आहेत. #rajura #Close
राजुरा-मात्रा मार्ग बंद. 
👇👇👇👇👇👇

काल दुपारपासून पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजिवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आज दुपारी १ वाजताच्या दरम्यान खामोना जवळील नाल्यावरून ५ फूट वरून पाणी वाहत असल्याने राजुरा-गडचांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वाहतूक ठप्प झाल्याने पुलाचा दोन्हीकडे वाहनांचा रांगा लागल्या आहे. पोलिसांचा येथे पहारा सुरु आहे. याच मार्गावरील आर्वी गावाच्या नाल्यावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे.
   
  गोवरी कॉलनी ते कढोली व पोवनी ते कढोली जाणाऱ्या मार्गावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे. राजुरा-मात्रा, सुमठाणा बोडगाव, राजुरा-सुमठाणा मार्गावरील नाल्यावरील पुलाला लागून पाणी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली.  जिकडे-तिकडे मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अनेक भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी शेतशिवारात तर घरांत पाणी शिरले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने