पत्नीचा खुन करणारा आरोपीला अटक. #Murder #death #arrested

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- जंगलात पत्नीचा खुन करून फरार झालेल्या आरोपीला अखेर भिसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. भिसी पोलिसांनी आरोपी बबलू शिंदेवार जांभुळघाट येथील राहत्या घराची झडती काल रात्रो साडेसात वाजता घेतली असता. तो घरातच दडून बसला असल्याचे पोलिसांना दिसून आले. यानंतर कुठलाही विलंब न करता आरोपी बबलू शिंदेवार याला भिसी पोलिसांनी ताब्यात घेतले. #Murder #death #arrested

💥सरपणासाठी जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या.
👇👇👇👇👇👇
 सरपणासाठी पत्नीला जंगलात नेऊन पतीनेच हत्या केल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथे उघडकीस आली आहे. शालू बबलू शिंदेवार (वय 40) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती बबलू शिंदेवार हा फरार झालेला आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजताचे सुमारास सरपण आणण्यासाठी पती बबलू शिंदेवार यांनी पत्नी शालुला जांभुळघाट गावाला लागून असलेल्या जंगलात नेले आणि त्याठिकाणी पत्नी शालुची हत्या केली.
आरोपी बबलू शिंदेवार याला भिसी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खुन करण्यामागील कारणे विचारली असता, पत्नी शालु ही दुसऱ्या सोबत भांडे विकायला जात होती व आरोपी पतीला सोबत नेत नव्हती हे कारणे आरोपींनी सांगितली. या दोन मुद्यान्वये आरोपीच्या मनात पत्नी शालु बाबत शंका निर्माण झाली होती.
पत्नीच्या चारित्र्यावर शंका मनात असल्याने तिला सरपनाच्या निमित्ताने जंगलात नेले, दगडावर तोंड आपटूआपटू मारले व यानंतर गळ्यात दोरी टाकून ओढत नेले. असा कबुलीजबाब आरोपी बबलू शिंदेवार यांनी पोलिसांना दिला आहे. आरोपी बबलू शिंदेवार याला भांदवी ३०२ कलमान्वये अटक करण्यात आली आहे.
चंद्रपूर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे,चिमूर पोलिस उपअधीक्षक नितीन बघाडे,भिसी पोलिस निरीक्षक मनोज गभणे,यांच्या मार्गदर्शनाखाली पि.एस.आय.सचिन जंगम,हे घटनेचा तपास करीत आहेत व बिट जमादार अमोल नवघरे,पोलिस शिपाई बालाजी एबंनवार हे त्यांना तपासात सहकार्य करीत आहेत.
#Murder #death #arrested