Click Here...👇👇👇

वाघ व बिबट्याच्या बंदोबस्त करा:- अविनाश पाल यांची मागणी. #Demand #tiger #Settlement #Leopards

Bhairav Diwase


(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सध्या शेतकऱ्याचे शेतीचे हंगाम सुरु असून नेहमी शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेतीचे कामे करावी लागतात परंतु सध्या व्याहाड बूज, सामदा शिवारात वाघ व बिबट्याचा धुमाकूळ सुरु असून या जंगली श्वापदांनी अनेक नागरिकांना जखमी व ठार केलेला आहे व पाळीव प्राण्याच्या जिव घेतला आहे. त्याचे बंदोबस्त करण्यात यावे. #Demand #tiger #Settlement #Leopards 

सावली तालुक्यात मागील ३ ते ४ वर्षापासून जंगलातील हिंस्त्र पशु वाघ व बिबट या प्राण्यांचा मानवावर व पाळीव प्राण्यावर जिव घेणे हल्ले सुरु आहे. दि. १३/०७/२०२१ रोज मंगळवारला रात्रो व्याहाड बूज येथील गंगुबाई रामदास गेडाम या महिलेच्या गळ्यावर हमला करून ठार मारण्यात आले लगेच दोन दिवसांनी सामदा येथील एका शेतकऱ्यावर पहाटे हमला करून जखमी केला हि बातमी ताजी असताना दि १८/०७/२०२१ च्या रात्रो वाघोली बुट्टी येथ्गील तुळसाबाई बाबुराव मशाखेत्री यांच्यावर हल्ला करून तिला जखमी केला आहे तिच्यावर सध्या सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरु आहे.

दि. २१/०७/२०२१ ला शेतकरी शेतात काम करीत असताना दुपारी जेवण विश्रांतीच्या वेळेस बैलावर हमला करून त्याचा बळी घेतला. अशा अनेक प्राणघातक हमले या परिसरात झालेले आहेत व होत आहेत. हे कशामुळे होत आहे तर माणसाचे जंगलातील वन जमिनीच्या अतिक्रमणामुळे प्राण्यांचा वावर करण्याची अडचण निर्माण होत असल्याने ते जंगल सोडून गावात शिरकाव करीत आहेत. अशा अतिक्रमणाची जागा खाली करण्यात याव्या.

सध्या शेतकऱ्याचे शेतीचे हंगाम सुरु असून नेहमी शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना शेतीचे कामे करावी लागतात सध्या या अशा घटनेमुळे जनता भयभीत होऊन स्वतःच्या घरी सुद्धा सुरक्षित नाही तर खुल्या जागेतील रस्त्याने व जंगलात का म्हणून सुरक्षित राहतील. शेतकऱ्याचे बैल, म्हैस व शेळी हे पाळीव प्राणी शेतकऱ्याचे मित्र व आर्थिक उत्पादनाचे साधन आहे. तसेच यामुळे शेणखत, दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करून त्यांना आर्थिक मदत होत होती. परंतु दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांना चराईसाठी जागा नसल्याने व हिंस्त्र पशूच्या हल्ल्याने सुद्धा जनावरांचे प्रमाण कमी होत चालले आहे.

त्यांचे बंदोबस्त लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी अविनाश पाल अध्यक्ष भाजपा तालुका सावली तथा जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.