बल्लारपुरात पुन्हा गँगवार...... #Gangwar #Ballarpur

Bhairav Diwase

तलवारीने व लाठीने वार करून गंभीर जखमी.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
बल्लारपुर:- बल्लारपूर तालुक्यात रात्रौ. 9:30 वाजताच्या सुमारास महाराणा प्रताप वार्ड येथील सुभाष चौक येथे गॅंगवार मध्ये एका ला तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. #Gangwar #Ballarpur
खूप दिवसापासून दोन्ही गॅंग मध्ये पुरानी दुश्मनी आहे. झगडे भांडण चालूच होते, दोन्ही गॅंग हातात तलवार घेऊन एकमेकांवर हल्ला करण्याकरिता तयारच राहत होते. दि. 23 रोजी सुद्धा रात्रौच्या सुमारास हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत होते. रात्रौ. 9:30 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला पकडून तलवारीने व लाठी ने वार करून गंभीर जखमी केले. माहिती मिळताच वेळेवरच पोलीस दाखल होऊन जखमींला दवाखान्यात नेण्यात आले. घटनास्थळी पोलीसदाखल होऊन आरोपीचा शोध घेत आहेत.