Top News

डॉ. राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना साहित्य वाटप. #Pombhurna


पोंभुर्णा:- वाढदिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. हा दिवस कायम आठवणीत राहावा म्हणून कुणी मित्रांना पार्टी देतो तर कुणी सामाजिक उपक्रम राबवितात. असाच एक सामाजिक उपक्रम म्हणून डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेड पोंभुर्णा तर्फे युवकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला. #Pombhurna
यावेळी मैदानी सराव करणाऱ्या युवकांना स्पोर्ट टी-शर्ट वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या कार्यक्रमाला खुद्द डॉ. राकेश गावतुरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमुल्य असे मार्गदर्शन केले.
आपल्या मनोगतामध्ये डॉ.गावतुरे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद असते, त्यांनी विचार केला तर ते कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतात. तेव्हा प्रत्येक युवकांनी प्रयत्न करावे. काही अडचण आल्यास मी सोबत आहे असा आशावाद डॉ. गावतुरे यांनी दिला.
🟥
बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी लहान पदापासून मोठ्यात मोठ्या पदापर्यत पोहचले पाहिजे अशी इच्छा डॉ. गावतुरे यांनी व्यक्त केली. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर, डॉ. दीपक जोगदंड, श्रीकांत शेंडे, दयानंद गुरनुले, प्रशांत गोंगले, रोशन गुरनुले, प्रतिप कोडापे स्नेहल गेडाम, रुपचंद गुरनुले, व युवक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संचालन श्रीकांत शेंडे केले व आभार प्रशांत गोंगले यांनी मानले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने