Top News

धक्कादायक! तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांची आत्महत्या. #Murder #death


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
यवतमाळ:- तीन वर्षीय मुलाची हत्या करून वडिलांनी गळफास घेउन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगरूळ (ता.यवतमाळ) येथे घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. संजय शिवा उके (30), असे वडिलांचे, तर सहयोग उके (3 वर्षे), असे मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. #Murder #death
मृत संजय मागील काही वर्षांपासून चिचघाट (ता.यवतमाळ) येथे सासरी राहात होता. गुरुवारी तो मुलाला घेऊन मंगरूळ येथे आला. मजुरी करून तो उदरनिर्वाह करत होता. बराच उशीर होऊनही संजय घराबाहेर आला नसल्याने शेजारच्या लोकांनी उघड्या असलेल्या खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता, वडील व मुलगा दोघेही गळफास लावलेल्या स्थितीत आढळले. घटनेचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने