Click Here...👇👇👇

बंदुकीचा धाक दाखवून दोन लाख रुपये लुटले. #Gun

Bhairav Diwase

विना क्रमांकाच्या पल्सर दुचाकीवरून येऊन दोघांनी लुटले.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मुल:- राजोली येथील विनोद मुसळे यांचे विरव्हा येथे पेट्रोल पंप आहे. काल रात्री आठ वाजता चे दरम्यान दोन युवक पल्सर या दुचाकी वाहनावर बसून पेट्रोल पंपावर आले. पेट्रोल पंपाचे मालक विनोद भोसले यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले दोन लाख रुपयासह दुचाकीवर बसविले. त्यांच्याकडून पैसे घेऊन, मुसळे यांना विरव्हा जवळ सोडले आणि पैसे घेऊन पसार झाले.
याची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिलेली आहे. #Gun
या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. मागील काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात अपराधाचे प्रमाण वाढत असून औद्योगिक क्षेत्राकडे असलेल्या अपराधाचे लोन आता शांत असलेल्या मूल, सिंदेवाही तालुक्यातही पसरल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.