💻

💻

स्व. गजाजन गोरंटीवार यांच्या जन्मजयंतीनिमित्य पोंभुर्ण्यात वृक्षारोपण. #pombhurna

जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी वाहली आदरांजली.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा तालुक्याचे नेते, तथा शहराचे माजी नगराध्यक्ष स्व. गजाजनजी गोरंटीवार यांच्या जन्मजयंतीदिनी त्यांच्या सेवेला व कार्याला उजाळा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा यांचेवतीने शहरात वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. #pombhurna
यावेळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपस्थित राहून पोंभुर्णा पोलीस ठाण्यात वृक्षारोपण केले.
तसेच स्थानिक जनसंपर्क कार्यालयात स्व. गजाजनजी गोरंटीवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

यावेळी, पं. स. सदस्य विनोद देशमुख, माजी उपनगराध्यक्षा सौ. रजियाताई कुरेशी, पोलीस निरीक्षक जोशी साहेब, भाजपचे शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, महामंत्री गजानन मूडपुवार, तालुका महामंत्री हरीश ढवस, ईश्वरभाऊ नैताम, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन चलाख, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष नैलेश चिंचोलकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विनोद कानमपल्लीवार, युवा मोर्चाचे तालुका महामंत्री आदित्य तुम्मूलवार, अमोल मोरे, माजी सरपंच रंजित पिंपळशेंडे, दर्शन गोरंटीवार, आदींसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत