🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

चेक ठाणेवासना येथिल व्यायामशाळेचे लोकार्पण संपन्न. #Exerciseschool

माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचेहस्ते लोकार्पण.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्ज व्यायामशाळेचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे शुभहस्ते फित कापून पार पडला. #Exerciseschool

राज्याचे माजी मंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चेक ठाणेवासना ग्रामपंचायतीला मिळालेल्या २५/१५ च्या निधीमधून ही देखणी व्यायामशाळा बांधण्यात आली असून व्यायामशाळेसाठी लागणारे साहित्य जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी उपलब्ध करून दिले. #Gym 
तसेच आजच्या कृषीदिनाचे औचित्य साधून प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते याठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले. #Gymnasium
याप्रसंगी बोलताना, पोंभुर्णा तालुक्याच्या भूमीचा न भूतों असा विकास आदरणीय सुधीरभाऊंच्या विकासवादी दृष्टिकोणामूळे झाल्याचा आपण पाहतो आहोत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे खेचून आणून या भागाचा चेहरामोहरा बदलविण्याचे काम आदरणीय सुधीरभाऊंनी केले. मागे चेकठाणेवासना ग्रामस्थांनी गावात व्यायामशाळेसाठी मागणी केली, आपली ही मागणी सुधीरभाऊंच्या पुढाकाराने पूर्ण होऊन आज ही देखणी व्यायामशाळा उभी झाली. त्यामुळे या व्यायामशाळेचे लोकार्पण करत असताना मला मनस्वी आनंद होतो आहे. असे मत जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना, या व्यायामशाळेचा रितसर उपयोग घेऊन गावातील तरूणांनी येथे शारीरिक कसरत करावी. आणि निरोगी व सुदृढ राहावे. असा सल्लाही लोकार्पणावेळी त्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी पं. स. सदस्य विनोद देशमुख, सरपंचा सौ सुरेखा मेश्राम, आष्टाचे माजी सरपंच हरिभाऊ ढवस, माजी सरपंच बाळूभाऊ पिंपळशेडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय मस्के, वैभव पिंपळशेडे, भगीरथ पावडे, रंजित पिंपळशेडे, नैलेश चिंचोलकर, अमोल मोरे, सौ. सुलोचना देवाडे, सौ. सुचिता धोटे, सौ. अर्चना वाढई आदींसह ग्रामस्थ तरुणमंडळी आवर्जून उपस्थित होते.