Top News

पल्लेझरी येथील भिमराव जाधव यांच्या घरी दोन वर्षांपासुन राहत असलेली अनओळखी महिला फरार. #Unknownwomen

पोलिस स्टेशन पिट्टिगुडा निरीक्षक शरद आवारे यांनी महिलेच्या शोध घेण्यास नकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील पोलिस स्टेशन पिट्टीगुडा हादीत येत असलेल्या पल्लीझरी येथिल भिमराव विठ्ठल जाधव यांच्या घरी दोन वर्षांपासून राहत असलेल्या महिला व मुलांबद्दल पोलिस स्टेशन पिट्टिगुडा येथिल पोलिस निरीक्षक शरद आवारे यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही व पल्लेझरी येथील पोलिस पाटील भगवान धाडगे यांनी सुध्दा मुशाफिर रजिस्टर मध्ये कसलाही प्रकारची नोंदणी केलेली नाही, अंगणवाडी सेविका व तंटामुक्ती समिती अध्यक्ष बालाजी कांबळे यांनी भिमराव विठ्ठल जाधव यांच्या घरी वारंवार गेले असता त्या भिमराव विठ्ठल जाधव यांनी स्पष्ट पणे नाव‌ नोंदणी करण्यासाठी नकार देत होता, कोरोना काळामध्ये "माझे कुटुंब माझी जबाबदारी" सर्वेक्षण झाले पण भिमराव विठ्ठल जाधव यांनी त्या अनओळखी महिलेच नाव नोंदणी करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला आहे.
शिवसेना महिला तालुका संघटीका शिंधूताई जाधव यांनी सदर अनओळखी महिलेची चौकशी करण्यासाठी गावातील तंटामुक्ती अध्यक्ष, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, पोलिस स्टेशन पिट्टिगुडा येथिल उपनिरीक्षक साहेब यांच्या कडे लेखी तक्रार केली असता पुर्ण पणे यांनी दुर्लक्ष केले आहेत.
परंतु हा मुद्या शिवसेना तालुका संघटिका सिंधूताई जाधव रेटून धरल्यानंतर सर्वांनी चौकशी करण्यासाठी कार्यवाही केली. मा.पोसिल उपनिरीक्षक साहेब यांनी श्री भिमराव विठ्ठल जाधव यांना नाव नोंदणी करण्याकरिता तोडी सुचना दिल्या होत्या पण नाव नोंदणी न करता ती महिला व दोन लहान मुले सोबत घेऊन दोन वर्षा नंतर पल्लीझरी या गावातून दिनांक. १०/०६/२०२१ रोजी सकाळी ०८:०० वाजताच्या दरम्यान फरार झाली आहे पोलिस स्टेशन पिट्टिगुडा उपनिरीक्षक शरद आवारे यांच्या निष्काळजीपणा मुळे सदर महिला फरार झालेल्या आरोप सिधूताई जाधव यांनी पोलिस अधीक्षक जिल्हा चंद्रपूर यांच्या कडे तक्रार दाखल केली आहे व फरार महिलेच्या शोध घेऊन संबंधित श्री. भिमराव विठ्ठल जाधव व पोलीस उपनिरीक्षक शदर आवारे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असेही सिंधूताई जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.  #Unknownwomen

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने