उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
95.60 टक्के घेऊन सृष्टी परशुराम गर्गेलवार प्रथम तर 92 टक्के घेऊन शीतल दत्ता बाजगीर द्वितीय स्थानावर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- सन 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावी चा निकाल नुकताच जाहीर झाला. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श हायस्कुल राजुरा येथील इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
कोविड -19 या महामारीचा वाढता प्रादुर्भाव बघता शासन निर्णयानुसार इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द कारण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतिनुसार इयत्ता नववी चा अंतिम निकाल, इयत्ता दहाविच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इयत्ता दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्याक्षिक, अंतर्गत मूल्यमापन इत्यांदिच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विध्यार्थीना गुणदान कारण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
सर्व यशस्वी विध्यार्थीचे बा.शी.प्र.मं. चे अध्यक्ष सतीश धोटे, उपाध्यक्ष मनोहर साबनानी, सचिव भाषकर येसेकर, सह सचिव शंकरराव काकड़े, कोषाध्यक्ष प्रकाश बेजँकिंवार, संचालक मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, लक्षमनराव खडसे, मंगला माकोडे, मुख्याध्यापक सारीपुत्र जांभुळकर, आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, वर्गाशिक्षक नवनाथ बुटले, संतोष वडस्कर, प्रशांत रागीट, मेघा वाढई, प्रतिभा मोरे, आशा बोबडे, भाग्यश्री क्षीरसागर आदींसह सर्वांनी अभिनंदन केले.
#Result