वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू. #Tigerattack

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील नवेगाव (लोण) येथील काशीनाथ पांडुरंग तलांडे वय 55 नवेगाव(टोला) हे शेत कामाकरिता जिल्हा परिषद शाळेच्या मागे शेतात गेले. शेतात काम करतांना गट न.62 झुडपी जंगलात दडून असलेल्या वाघाने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जागीच ठार केले. ही घटना कळताच गावातील नागरिकांनी वनविभागाला कळविले. व काही वेळातचवनरक्षक दिघाम्बर कावळे व त्यांची चमू ही घटनास्थळी दाखल झाली.सदर घटनेचा पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.