जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न अवॉर्ड मानकरी ठरला प्रेम नामदेव जरपोतवार. #Award #Chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- सामाजिक जाणीव असणारा चंद्रपूर तालुक्यातील जुनोना येथील प्रेम नामदेव जरपोतवार याला राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समजरत्न अवार्ड 2021 देण्यात आला. #Award #Chandrapur

जुनोना गावात युवक विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर फक्त खेळण्यात वेळ वाया घालवित होते. तेव्हा त्यांना अभ्यासाच्या प्रवहात आणण्याकरिता गावातिल वाचानालयात अभ्यासवर्ग सुरु करुन विद्यार्थ्याना शिकवण्यास सूरवात केली नंतर विविध उपक्रम घेतले.नंतर कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावाने सगळ्या शाळा बंद झाल्या आणि अभ्यासवर्ग सुद्धा बंद करावे लागले परंतु या शाळा बंद असल्याचा परिणाम म्हणजे मुलं रस्त्यावर सैरावैरा पडत दिसले आणि अभ्यसापासुन दूर जाऊ लागले आणि ही गोष्ट प्रेम जरपोतवार च्या मनाला घासली आणि त्याने विचार केला की हि परिस्थिती निरंतर अशीच चालत राहिली तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होणार नाही त्यामुळे अभ्यासवर्ग सुरु करण्याचें निर्णय घेऊन पालकांची परवानगी घेतली आणि कोरोना चा नियमाचे पालन करून वर्ग सुरु केले.
मुलांना आवड होतिच मुले रोज जाऊ लागली शिक्षण घेऊ लागलीं नंतर प्रेम जरपोतवार याने विविध स्पर्धा व उपक्रम घेतले आणि खेळांच्या माध्यमातुन शिकवले या सर्व उपक्रमाच्या अनुषंगाने तो त्याच्या अभ्यासात बुद्धी करण्याचा प्रयत्न करत आहे.त्याला समाजाबद्दल आधीपासूनच रुची होती त्यानंतर त्यांनी समाजकार्याचे शिक्षणात प्रवेश घेतला आणि याचा सर्व परिणाम त्याच्यावर झाला जुनोना गावात 3 वर्षा पासून गावातील विध्यार्थ्यांचे अभ्यासवर्ग व त्यांचा साठी विविध उपक्रम घेत आहे आणि या कोरोना काळात मुलाच्या शाळा बंद असताना सुद्धा सामाजिक अंतराचे जाणीवपूर्वक वर्ग सुरु केले. त्यात विविध उपक्रम पार पाडले.
🟥
त्यासाठी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समजरत्न अवार्ड 2021 घोषीत केले होते.हा पूरस्कार मुबंई मध्ये पूरस्कार वितरण होणार होते परंतू कोरोना च्या प्रादुर्भावामुळे ते होऊ शकले नाही. परंतु याची दखल घेत हा पुरस्कार पोस्टाद्वारे घरापर्यंत पाठविला त्या बद्द्ल गुनिजन गौरव पुरस्कार वितरन संयोजन समिती ,मुंबई यांचे प्रेम जरपोतवार याने आभार मानले.तसेच नेहमी उपक्रमास आणि वेळोवळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनपुर्वक आभार असेच नेहमी सेन्ह प्रेम माझ्यावर सदैव असावा असा अशावाद प्रेम जरपोतवार याने व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत