दक्षिण मध्य रेल्वेगाड्या बल्लारशाह पर्यंत सोडा. #Railway

Bhairav Diwase
0
माजी आमदार सुदर्शन निमकर; रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना महामारी रोगामुळे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत काही गाड्या फक्त तेलंगणा राज्याच्या सिरपूर-कागजनगर आणि सिरपूर टाऊन पर्यंत सुरु करण्यात आल्या आहेत, त्या कोरोना महामारीमुळे महाराष्ट्र राज्यात आणल्या जात नाहीत. त्या गाड्या दक्षिण मध्य रेल्वेच्या शेवटच्या स्टेशन पर्यंत आणण्याची मागणी राजुराचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.#Adharnewsnetwork
दक्षिण मध्य रेल्वेची मर्यादा महाराष्ट्राच्या बल्लारशाह स्टेशनपर्यंत आहे. परंतु लॉकडाऊन काळात बल्लारशाहकडे येणाऱ्या गाड्या बंद केल्यामुळे महाराष्ट्रातील बल्लारशाह आणि जिल्हा मुख्यालय चंद्रपूर परिसरातील प्रवाशांना अडचणी येत आहेत. आणि हा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे. तेलंगणातील कागजनगर आणि महाराष्ट्राचा बल्लारशाह दरम्यानचा भाग हा सीमाभाग आहे. या परिसरात बहुतांश तेलगू भाषिक नागरिक राहत असून या भागाचा मोठ्या प्रमाणात तेलंगणातील राज्यातील गावांशी जनसंपर्क असल्यामुळे दैनंदिन रहदारी मोठ्या प्रमाणात आहे आणि सिमाभागातील लोकांना सुविधा देण्यासाठी रेल्वेगाड्या सिकंदराबाद आणि काझीपेठ ते सिरपूर - कागजनगर ते बल्लारशाह पर्यंत वाढवल्या पाहिजेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे गाड्या बल्लारशाह पर्यंत पुन्हा सुरू कराव्यात आणि सिरपूर - कागजनगर पर्यंत चालणाऱ्या गाड्या बल्लारशाह पर्यंत वाढवाव्यात. याच बरोबर नागपूरहून सिकंदराबादकडे जाणारी इंटरसिटी एक्सप्रेस (02772) माणिकगड रेल्वे स्टेशन आणि विरूर स्टेशनवर थांबत होती, परंतु ही ट्रेन रायपूर ते सिकंदराबाद पर्यंत धावत असल्याने माणिकगड स्टेशन आणि विरूर स्टेशनचा थांबा बंद करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत असून या रेल्वेगाडीचे थांबे देण्यासाठी नागरीक मागणी करीत आहे.
नागरिकांची ही मागणी लक्षात घेता माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्या बल्लारपूर पर्यंत सोडण्याच्या मागणीचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पाठविले आहे.#Railway

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)